१४ वर्षाआतील मुलांची क्रिकेट निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

 

जळगाव समाचार | १३ जुलै २०२६

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघासाठी निवड चाचणी अनुभूती निवासी स्कूलच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगणावर उत्साहात पार पडली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेखाली झालेल्या या निवड प्रक्रियेला जिल्हाभरातून विक्रमी ३०० खेळाडूंनी प्रतिसाद दिला. निवड समितीचे अध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या परीक्षणानंतर ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड करण्यात आली.

निवड प्रक्रियेदरम्यान जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव तथा निवड समितीचे निमंत्रक अरविंद देशपांडे उपस्थित होते. तसेच संतोष बडगुजर, हितेश पटेल आणि सुयश बुरूकुल यांनी निवड चाचणी यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य केले. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवड प्रक्रिया पार पडली.

प्राथमिक फेरीत निवड झालेल्या ८८ खेळाडूंमध्ये १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर विविध संघांद्वारे सराव व निवड सामने खेळविण्यात येणार आहेत. या सामन्यांमधील कामगिरीच्या आधारे अंतिम २५ खेळाडूंची निवड करण्यात येणार असून, ते जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र ठरणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here