जळगाव मनपा मानाच्या गणपतीचे महापौरांच्या संकल्पनेखाली पर्यावरणपूरक विसर्जन २३ वर्षांत प्रथमच नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा मिरवणुकीत विक्रमी सहभाग

​जळगाव समाचार | २५ सप्टेंबर २०२६

जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या श्री गणेशाची शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी अत्यंत थाटामाटात आणि उत्साही वातावरणात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या प्रारंभी महापौर दीपमाला काळे, महापौर दीपमाला मनोज काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त आदित्य जीवने, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते श्रींची भावपूर्ण महाआरती करण्यात आली. ​महानगरपालिकेच्या २३ वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच महापौर, उपमहापौर, पदाधिकारी तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांनी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत एवढ्या मोठ्या संख्येने प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.

महानगरपालिकेचा मानाचा गणपतीला सकाळी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरावर आणि जल्लोषात पदाधिकारी व प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी ठेका धरत नृत्य केले. शहरातील विविध चौकांमध्ये महापौर, उपमहापौर, आयुक्तांसह नगरसेवकांनी ठेका धरून जळगाववासीयांचे लक्ष वेधून घेतले. ​यंदा महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून श्री गणेशोत्सव सलग १२ दिवस मोठ्या उत्साहात, पर्यावरणपूरक आणि विविध विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

या सोहळ्याला भाजप गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते प्रफुल्ल देवकर, शिवसेना (ठाकरे गट) गटनेत्या अर्शीनबानो खाटीक, नगरसेवक डॉ. राधेश्याम चौधरी, दीपक सूर्यवंशी, उज्ज्वला बेंडाळे, विशाल भोळे, नितीन बरडे, अरविंद देशमुख, सुनील खडके, ऍड. शुचिता हाडा, अमित काळे, राजेंद्र घुगे पाटील, डॉ. विश्वनाथ खडके, गायत्री राणे, सुरेखा तायडे, वैशाली पाटील, नितीन सपके, अमर जैन, रंजना वानखेडे, प्रदीप रोटे, इब्राहिम पटेल, नरेंद्र पाटील, डॉ. अमृता सोनवणे, डॉ. गौरव सोनवणे, रेश्मा काळे, वंदना इंगळे, उज्ज्वला बाविस्कर, मंगला चौधरी, आशा रमेश पाटील, अंकिता पंकज पाटील, अनिता भापसे, जयश्री पाटील, जाकीर पठाण, कविता शिवदे, माधुरी बारी, रिटा सपकाळे, संगीता दांडेकर, सागर सोनवणे, हर्षल मावळे, रमेश मतानी, विजय बांदल, पूजा जगताप, प्रतीक्षा सोनवणे, अर्चना पाटील, कल्पेश सोनवणे, विद्या सोनवणे, कविता पाटील, अनिल अडकमोल, रितिक ढेकळे, रबियाबी अमजद खान, अक्षय वंजारी, हिनाबी खान यांच्यासह महापालिकेचे सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here