जळगावच्या २८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

 

जळगाव समाचार | ३० एप्रिल २०२६

महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना सन २०२५ साठीचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ व प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आले असून जळगाव जिल्ह्यातील तब्बल २८ जणांनी या मानाच्या सन्मानात स्थान मिळवले आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी २९ एप्रिल रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केला आहे.

या सन्मानासाठी जळगाव जिल्ह्यातून पोलीस उप अधीक्षक अण्णासाहेब बाळासाहेब घोलप यांची निवड झाली असून त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील नऊ सहायक पोलीस उप निरीक्षकांनाही या सन्मानासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. यात भरतसिंग प्रल्हाद पाटील, दिलीप मेघराज जाधव, शामकांत दिनकर सोनवणे, सलीम खान बशारत खान, मिनाक्षी दिलीप सावळे, सखाराम छबूराव सकट, अफजल युसुफ खान, विठ्ठल शंकर फुसे आणि रविंद्र सर्जेराव गायकवाड यांचा समावेश आहे.

याशिवाय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (चालक) अनिल भाऊराव चौधरी, सलीम शेख मुसा पिंजारी यांच्यासह हवालदार मनोज शिवाजी गायकवाड, अशोक दौलत अहिरे, संदीप रमेश पाटील, किरण निंबालाल धमके, विद्या हरिलाल पाटील, विजय बळीराम नेरकर, संदीप भिकन पाटील, राहुल भिमराव सोनवणे, सुरज मधुकर पाटील, नितीन प्रकाश बाविस्कर, विजय गोरखनाथ पाटील, अकरम याकुब शेख, इरफान यासीन मलिक यांनाही सन्मान जाहीर झाला आहे. तसेच पोलीस नाईक अश्विन साहेबराव हडपे, अतुल संतोष चौधरी, सचिन रमेश सोनवणे आणि संदीप अशोक नन्नवरे यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस दलात विविध स्तरांवर उत्कृष्ट सेवा बजावत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच काहींना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवा पदक व शौर्य पदक प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. या यशाबद्दल महासंचालकांनी सर्वांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, १ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर या सर्वांचा अधिकृत सत्कार करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here