जळगाव समाचार | १३ मे २०२६
विद्यापीठ परिसरातील टाकरखेडा येथील रहिवासी तसेच भारतीय सैन्यदलातील निवृत्त सैनिक रामचंद्र चिंधू नन्नवरे यांचे काल सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रामचंद्र चिंधू नन्नवरे यांनी भारतीय सैन्यदलात दीर्घकाळ सेवा बजावत देशसेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. भारत-चीन संघर्ष तसेच १९७१ च्या युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभर उसळलेल्या दंगल काळातही त्यांनी आपले कर्तव्य बजावत सेवा बजावली होती.
सेवानिवृत्तीनंतर ते आपल्या परिवारासह टाकरखेडा येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी शेवंताबाई रामचंद्र नन्नवरे, मुले, सुना, मुली, जावई तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी जनार्दन बाविस्कर यांचे सासरे आणि जळगाव समाचार वृत्तसंस्थेचे संपादक आकाश बाविस्कर यांचे आजोबा होत.
त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ४ वाजता राहत्या घरून निघणार असून, त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

![]()




