प्रभाग ४ ‘ड’ मध्ये पियूषभाऊ कोल्हेंना नागरिकांकडून भरभरून पाठिंबा

 

जळगाव समाचार | ६ जानेवारी २०२६

जळगाव महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, शहरात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अशा वातावरणात प्रभाग क्रमांक ४ ‘ड’ मधील शिवसेनेचे उमेदवार पियूषभाऊ कोल्हे यांनी प्रभावी आणि लोकाभिमुख प्रचारातून मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रचारादरम्यान त्यांना नागरिकांकडून मिळणारा वाढता पाठिंबा हा त्यांच्या विश्वासार्हतेचा आणि कार्यशैलीचा प्रत्यय देणारा ठरत आहे.

घराघरांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत पियूषभाऊ कोल्हे यांनी प्रभागातील मूलभूत प्रश्न, अडचणी आणि अपेक्षा समजून घेतल्या. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबवून येत्या काळात प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या स्पष्ट, सकारात्मक आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभाग पाहता, पियूषभाऊ कोल्हे हे केवळ उमेदवार न राहता प्रभागाच्या विकासाचे प्रतिनिधी म्हणून पाहिले जात असल्याचे चित्र स्पष्ट होते. युवा नेतृत्व, संयमी संवाद आणि काम करण्याची तयारी या गुणांमुळे ते मतदारांच्या पसंतीस उतरत आहेत.

आपले आजोबा स्व. विजयराव (विजूबापू) कोल्हे यांनी प्रभागात केलेल्या भरीव विकासकामांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार पियूषभाऊ कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. विजूबापूंनी घालून दिलेल्या विकासाच्या पायावरच नातू पियूषभाऊ नवे पर्व सुरू करतील, असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला असून, यंदाच्या निवडणुकीत कोल्हे घराण्याच्या कार्यकर्तृत्वाला पुन्हा एकदा संधी देण्याचा सूर प्रभागात उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here