पारोळा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षपदी दयावान पाटील तर महिला तालुकाध्यक्षपदी मीनाक्षी भोसले…

 

(विक्रम लालवाणी) प्रतिनिधी पारोळा

 

पारोळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या तालुकानिहाय आढावा बैठकीत दयावान रामदास पाटील यांची पारोळा तालुकाध्यक्षपदी व तर महिला तालुका अध्यक्षपदी मीनाक्षी भोसले यांची निवड करण्यात आली. त्याच बरोबर अल्पसंख्याक तालुका अध्यक्षपदी इरफान पठाण, युवक तालुका उपाध्यक्षपदी दीपक पाटील, सामाजिक न्याय तालुकाध्यक्षपदी अलका निरमुले, विद्यार्थी सेल अध्यक्षपदी राहुल शिंपी उपाध्यक्षपदी श्याम राठोड, तालुका कार्याध्यक्ष दीपक शिंदे, ओबीसी सेल सरचिटणीसपदी संदीप पाटील, विद्यार्थी सेल सरचिटणीस शुभम पाटील, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्षपदी काशिनाथ आखाडे, सेल तालुका अध्यक्ष दीपक सोनवणे, सोशल मीडिया प्रमुख अतुल पाटील यांची निवड करण्यात आली.
येणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पारोळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेच्या कामाला लागला असून त्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची “जनसन्मान यात्रा” जिल्हा तथा तालुका पदाधिकारी तालुकानिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्ष संघटना मजबूत करणे तथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिल्या.
जिल्हाध्यक्ष संजय पवार, डॉ संभाजीराजे आर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, सामाजिक न्यायचे अरविंद मानकरी, प्रदेश युवक सरचिटणीस किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हि निवड जाहीर करण्यात आली. निवड झालेल्या सर्व कार्यकारिणीचे अभिनंदन यावेळी डॉ संभाजीराजे पाटील यांनी केले.
डॉ संभाजीराजे पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश त्याबरोबर सुरु असलेल्या मतदारसंघात प्रत्येक गाव प्रत्येक घर जनाशीर्वाद यात्रेमुळे एरंडोल पारोळा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकत बघता महायुतीकडून डॉ संभाजीराजे पाटील यांची अधिकृत तिकिटासाठी प्रबळ दावेदारीची शक्यता आहे त्या दृष्टीने आजची कार्यकारिणी निवड महत्वाची मानली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here