जळगाव समाचार | ३० एप्रिल २०२६
जळगाव तालुक्यातील पाथरी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन फार्मफ्रेश फूड लिमिटेड व राजेश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नेस्लेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत पार पडलेल्या या शिबिरात एकूण १३५ रुग्णांनी लाभ घेतला.
या शिबिरात डॉ. अमीत भास्कर, डॉ. यज्ञेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बीपी, शुगर, ईसीजीसह विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या तसेच रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी रुग्णांना आवश्यक त्या उपचारांसोबतच जीवनशैलीतील बदल, संतुलित आहार आणि व्यसनमुक्तीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास हर्षा नन्नवरे, तेजस पाटील, सुनिता सिसोदिया, सागर मसाने तसेच म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रशांत चौधरी उपस्थित होते. तसेच सरपंच वैजंताबाई शिरसाठ, प्रदीपसिंग पाटील, संजू प्रकाश लंगरे, समाधान धनगर, पृथ्वीराज पाटील, दीपक जाधव, दीपक चांभार, आशुतोष माळी, रविंद्र धनगर यांची उपस्थिती होती.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी पाथरी ग्रामपंचायत तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, प्रशांत सूर्यवंशी, विक्रम अस्वार, अर्जुन प्रसाद, सुशील कदम, मुरलीधर नेटके यांनी परिश्रम घेतले. शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने तपासणी करून घेतली.

![]()




