जळगाव समाचार | ६ ऑक्टोबर २०२६
गोपाळपुरा दुर्गोत्सव मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सन २०२६ साठी मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी सभा घेण्यात आली. या सभेत सर्वानुमते नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये जयेश पाटील यांची अध्यक्षपदी, तर अमोल पाटील यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. मंडळाच्या सदस्यपदी बबलू बारी, रोहित पाटील, मोहित पाटील, जयेश कोळी, विशाल पाटील आणि अजय पाटील यांची निवड करण्यात आली.
यंदाच्या दुर्गोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने महिला भगिनींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांसह दुर्गोत्सवाच्या आयोजनासाठी आमदार राजूमामा भोळे, कैलास सोनवणे, ललित कोल्हे, निलेश तायडे, प्रवीण कोल्हे आणि ललित चौधरी यांचे सहकार्य लाभणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.

![]()






