जळगाव समाचार | ४ ऑगस्ट २०२६
शकुंतला जे. माध्यमिक विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वीच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या सत्रात प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता, मजबूत पासवर्डचे महत्त्व, द्विस्तरीय प्रमाणीकरण (2FA), सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक व क्यूआर कोड स्कॅम, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे तसेच मोबाईल अॅप्स डाउनलोड करताना घ्यावयाची सुरक्षा काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
संवादात्मक पद्धतीने पार पडलेल्या या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करून सुरक्षित डिजिटल जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. राजेश्री महाजन तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

![]()





