जळगाव समाचार | ५ ऑगस्ट २०२६
जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे स्व. बबनभाऊ बाहेती यांच्या जयंतीनिमित्त १ व २ ऑगस्ट रोजी कांताई सभागृहात आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या अंतिम फेरीत जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या नईम अन्सारी याने भुसावळ कॅरम क्लबच्या दानिश शेखचा १८-१६, २५-१२ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. विजेत्यास रोख ₹४,००० व चषक, तर उपविजेत्यास ₹३,००० व चषक प्रदान करण्यात आला.
तिसरा व चौथा क्रमांक अनुक्रमे अय्युब खान आणि रईस शेख यांनी मिळवला. त्यांना प्रत्येकी ₹१,५०० व चषक देण्यात आला. उपांत्य फेरीत नईम अन्सारीने अय्युब खानचा (२५-०४, २५-०६), तर दानिश शेखने रईस शेखचा (१९-०८, १९-१७) पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पाचव्या ते आठव्या क्रमांकासाठी फिरोज खान, सैय्यद मोहसिन, वसीम खान आणि रोशन खान यांना प्रत्येकी ₹१,००० चे पारितोषिक देण्यात आले. सर्व पारितोषिके रोहन बाहेती यांच्या सौजन्याने देण्यात आली, तर सागर सोपारकर यांनी तीन खेळाडूंना कॅरम स्ट्रायकर भेट दिले.
स्पर्धेचे प्रमुख पंच चंद्रशेखर नर्वरिया होते. बोर्ड पंच म्हणून सैय्यद युसुफ, वसीम मलिक, शेख अजीज, रईस शाह, वसीम खान, सज्जाद खान, जैद शेख, साकिब अन्सारी, अजहर शेख, अस्लम खान, सैय्यद जुबेर आणि शेख नाझीम यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम कोगटा, सचिव नितीन बरडे, उपाध्यक्ष रंगनाथ पाटील, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष मंजूर खान आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यासाठी सैय्यद मोहसिन, योगेश धोंगडे, फिरोज खान, नासीर खान, अताऊल्लाह खान, शेख अजीज आणि मुस्तफा बागवान यांनी सहकार्य केले.

![]()





