ढोल-ताशांचा गजरात अमर गणेश मंडळात पाठपूजन उत्साहात; श्रावण सोमवारनिमित्त साबुदाणा खिचडीचे वाटप

 

जळगाव समाचार | १ सप्टेंबर २०२६

बालगंधर्व खुले नाट्यगृहाशेजारील अमर गणेश मंडळाच्या वतीने ‘जळगावचा गणराज’ गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पाठपूजनाचा कार्यक्रम काल दि ३१ ऑगस्ट रोजी सयंकाकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ढोल-ताशांचा गजर, भक्तिमय वातावरण आणि आकर्षक लाईट शोमुळे परिसर गणेशोत्सवाच्या उत्साहाने भारावून गेला. प्रमुख पाहुणे शरद तायडे, सागर सपके, विशाल भोळे, मनोज चौधरी, किशोर भोसले, सुरज दायमा, पियुष गांधी आणि पियुष पाटील यांच्या हस्ते ‘जळगावचा गणराज’ची आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केला.

श्रावण सोमवारनिमित्त मंडळाच्या वतीने भाविक व उपस्थित नागरिकांसाठी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, विश्वगर्जना ढोल पथकाच्या दमदार ढोलवादनाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. ढोल-ताशांच्या निनादाने परिसर दुमदुमून गेला, तर आकर्षक लाईट शोने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

‘जळगावचा गणराज’च्या आगमनाची चाहूल लागताच परिसरातील गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमामुळे अमर गणेश मंडळाच्या गणेशोत्सवाची भक्तिमय सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष बबलू भोई, उपाध्यक्ष जितू दाभाडे, सदस्य अनिरुद्ध तिवारी, सदस्य जगदीश वाघमारे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here