Monday, December 23, 2024
Homeजळगावराष्ट्रवादी वैद्यकीय कक्ष व युवक रा.काँ तर्फे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर...

राष्ट्रवादी वैद्यकीय कक्ष व युवक रा.काँ तर्फे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर…

 

जळगाव, जळगाव समाचार डेस्क;

राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जळगाव महानगर यांच्या संयुक्तविद्यमाने न्यू फेडरेशन पिंप्राळा हुडको येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महानगर युवक उपाध्यक्ष फैजान राजू पटेल व वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष विक्की राजपूत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या शिबिरात 177 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात व २० ते २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिरात डॉ. राजेंद्र सरोदे, डॉ. ज्ञानेश्वर भेरडे आणि डॉ. प्रीती टोके यांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणी केली. तसेच अनेक नागरीकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेलीन रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक राजू पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, प्रदेश उपाध्यक्ष कल्पना पाटील, महिला महानगर महिला अध्यक्ष मीनल पाटील, युवक महानगराध्यक्ष सुशील शिंदे, वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष विक्की राजपूत, गौरव लव्हंगले, अमजत रंगरेज, हुसेन साबरी, हुसेन शेख आदी उपस्थित होत.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page