जळगाव समाचार | २८ एप्रिल २०२६
शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवार, जळगाव यांच्या वतीने १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. काळिकामाता मंदिराजवळील मिराई लॉन येथे आयोजित या धार्मिक विधीस समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या सोहळ्यात जळगाव येथील चि. सोहम प्रफुल्ल अत्रे, रेणवे नगर येथील चि. नयन सुधिर अत्रे व चि. देवेश सुधिर अत्रे, पिंपराळा येथील चि. सागर संजय कोके व चि. भूषण संजय कोके, इंद्रप्रस्थ नगर, जळगाव येथील चि. शौर्य शरद पाटील व चि. हर्षल शरद पाटील, भुसावळ येथील चि. कुशाग्र सुनिल अत्रे, अहमदाबाद येथील चि. जिग्नेश मनोहर जोशी, तसेच जळगाव येथील चि. मयुर संजय चौधरी व चि. वेदांत संजय चौधरी आणि चि. मोहित गौरव कुलकर्णी या बटूंचा सार्वजनिक व्रतबंध विधी पार पडला.
या व्रतबंध सोहळ्याचे पौरोहित्य गजानन लपाळीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. वेदशास्त्रसंपन्न देवेंद्र गडीकर यांनी उपस्थित बटूंना मार्गदर्शन व आशीर्वाद दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण परिवाराचे प्रकाश मुरलीधर अत्रे व चंद्रकांत अत्रे यांनी पुढाकार घेतला.
यावेळी महाराष्ट्र ट्रेडर्सचे संचालक अनिल जोशी व प्रशांत जोशी, प्राची सिड्सचे संचालक जितेंद्र अत्रे यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींनी मोलाचे सहकार्य केले.

![]()




