जामनेर-मुक्ताईनगर बसला भीषण अपघात, दहा प्रवासी जखमी; दोघे गंभीर…

जळगाव समाचार डेस्क। ६ ऑगस्ट २०२४

जिल्ह्यातील अपघाताचे सत्र काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. यातच अजून एक अपघाताची घटना घडली आहे. जामनेर येथून मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या बसचा सारोळा फाट्याजवळ अपघात झाला आहे. या अपघातात दहा प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघात काल संध्याकाळी साडेसात वाजता झाला. बसने अचानक झाडाला धडक दिली, ज्यामुळे हा मोठा अपघात झाला. यामध्ये बस चालक व वाहकासह अन्य प्रवासही जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील घटनास्थळी पोहोचले आणि जखमींची विचारपूस केली. पोलिसांनीही घटनास्थळी त्वरित पोहोचून मदतकार्य सुरु केले. गंभीर जखमींना उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे. तर इतर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here