अमळनेर आरोग्य व अग्निशमन कर्मचाऱ्यांनी एक महिन्याच्या बाळाला सुखरूप पुरातून बाहेर काढले…

 

जळगाव समाचार | ३१ जुलै २०२६

अमळनेर शहरात भालेराव नगर गुरुकृपा कॉलनीत नाल्याच्या पुराने प्रचंड कहर केल्याने अवघ्या एक महिन्याच्या बाळासह एक कुटुंब भीतीने थरथरत घरात पाणी शिरल्याने पाण्यात जीव वाचवण्याची धडपड करीत होते. मात्र अमळनेरच्या बहाद्दर अग्निशमन दलाचे व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनी पोहचून बाळ व कुटुंबाला सुखरूप स्थळी पोहचविले. सर्वत्र या कामाचे कौतुक केले जात आहे.

गुरुकृपा कॉलनीत नाल्याला पूर आल्याने प्रवाह जोरात होता छातीपर्यंत पाणी पोहचले होते. एका कुटुंबात अवघ्या एक महिन्याचा मुलगा आणि महिला इतर तिन लहान मुले अडकली होती. घरात खाटेवर पलंगावर उंच जागेवर उभे राहून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता.

घटनेचे वृत्त कळताच पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी पथक रवाना केले. आरोग्य निरीक्षक किरण कंडारे , गोल्डी बिऱ्हाडे , अग्निशमन कर्मचारी फारुख शेख , दिनेश बिऱ्हाडे , भिका संदांनशीव , पवन बिऱ्हाडे पोहचले मात्र पाण्याचा प्रवाह जोर धरत असल्याने तेथे पोहचता येत नव्हते अखेरीस दोर जॅकेट मागवले आणि साखळी तयार करण्यात आली. तब्बल दोन तासांनी पीडित कुटुंबापर्यंत पोहचले. एक महिन्याच्या बाळाला प्लास्टिक टब मध्ये अलगद घेऊन त्याच्या आई सह तीन महिला , तीन लहान मुले इतर सदस्य ,एक तरुण याना आजूबाजूच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर सुरक्षित पोहचविले. सर्वानी या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here