जळगाव समाचार | १५ जुलै २०२६
श्री महावीर सहकारी बँक लिमिटेड, जळगावच्या उपाध्यक्षपदी स्वरूपकुमार भागचंद लुंकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेच्या नवीपेठ येथील मुख्यालयात नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष दलिचंद जैन यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. संचालक मंडळाने एकमताने विश्वास व्यक्त करत लुंकड यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.
उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर स्वरूपकुमार भागचंद लुंकड यांनी संचालक म्हणून कार्यरत असताना संचालक मंडळाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत बँकेची प्रगती, ठेविदार व सभासदांचे हित, तसेच संस्थेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. संचालक मंडळाचा विश्वास सार्थ ठरेल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
या निवड प्रक्रियेवेळी संचालक सुभाष लोढा, अशोक खिवसरा, भास्कर कोळी, रविंद्र गुजराथी, गुणवंत टोंगळे, जितेंद्र कोठारी, शांतीलाल बिनायक्या, अजय राखेचा, श्रेयस कुमट, सागर पगारिया, कल्याणी नागुलकर, दीपिका चांदोरकर, रंजना देशमुख, आर. जे. पवार यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर पाटील तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

![]()





