जळगाव समाचार | २८ मे २०२६
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे आयोजित दोन दिवसीय पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण शिबिराचे आयोजन २७ व २८ मे २०२६ रोजी जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील बॅक वूड रिसॉर्ट येथे करण्यात आले. पक्ष संघटन बळकटीकरण, विचारधारा आणि कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या निवासी शिबिरात जिल्हा महानगरातील पदाधिकारी, आघाडी अध्यक्ष आणि नगरसेवकांसह सुमारे १५५ कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
शिबिराचे उद्घाटन २७ मे रोजी सकाळी करण्यात आले. यावेळी श्रीकांत भारती, प्रदीप पेशकार, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), प्रदेश सरचिटणीस भैरवी वाघ, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, लक्ष्मण सावजी, महापौर दीपमाला काळे, चंद्रकांत बाविस्कर, रवी अनासपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरामध्ये एकूण ११ सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी श्रीकांत भारती, लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकार, रवी अनासपुरे आणि चंद्रकांत बाविस्कर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे, प्रविण आळई, दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, माजी अध्यक्षा उज्वला बेडाळे आणि माजी महापौर सीमा भोळे उपस्थित होते. त्यानंतर प्रविण आळई, माजी आमदार संजय केणेकर आणि आमदार संजय कुटे यांनी प्रशिक्षण सत्रांमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
शिबिराच्या समारोपप्रसंगी खासदार मेधा कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पक्षाच्या वाढीसाठी कठीण काळात मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच भारतीय जनता पक्ष आज केंद्र आणि राज्यात सत्तेत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्षे पूर्ण झाली असून ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या तत्वावर सरकार कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख दीपक परदेशी होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, मिलिंद चौधरी, प्रकाश पंडित, उदय भालेराव, मयूर भदाणे, संजय नारखेडे, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी, जितेंद्र चव्हाण, आनंद सपकाळे, अमित देशपांडे, रोहित सोनवणे, चेतन तिवारी आणि हर्षल सेतवाल यांनी परिश्रम घेतले.
![]()






