Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होणार…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होणार…

 

जळगाव समाचार डेस्क | १५ ऑक्टोबर २०२४

देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर केल्या जाणार आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3.30 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रसह झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष विधानसभा निवडणुकांवर केंद्रीत झालं आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आचारसंहिता लागू होणार असून, राजकीय हालचालींना आणखी वेग येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रातील निवडणूक यंत्रणा अंतिम टप्प्यात असून सर्वांचे लक्ष आता दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page