नवी दिल्ली, जळगाव समाचार डेस्क;
UGC-NET परीक्षेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयाने UGC-NET 2024 परीक्षा रद्द केली आहे. परीक्षेतील अनियमिततेच्या तक्रारी समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे शिक्षण मंत्रालयाने (Ministry of Education) सांगितले. परीक्षेतील अनियमिततेचे प्रकरण सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात येणार आहे.
यूजीसी नेट परीक्षा १८ जून रोजीच झाली होती
18 जून रोजीच UGC-NET परीक्षा घेण्यात आली होती. मात्र त्यात अनियमितता असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शिक्षण मंत्रालयाने तो रद्द करण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण सीबीआयकडे गेल्यानंतर या गैरप्रकारांशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते.
किती जणांनी परीक्षा दिली?
या परीक्षेत 11 लाखांहून अधिक उमेदवारांनी भाग घेतला होता. ही परीक्षा ३१७ शहरांतील १२०५ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. त्यात एकूण 11,21,225 उमेदवार बसले होते.
Government is committed to ensure the sanctity of examinations and protect the interest of students.
Ministry of Education has decided that the UGC-NET June 2024 Examination be cancelled on the basis of inputs from Indian Cyber Crime Coordination Centre (I4C) under the Ministry…
— Ministry of Education (@EduMinOfIndia) June 19, 2024