रेल्वे स्थानकावर अपघातात ३६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू…

जळगाव समाचार | १२ मार्च २०२५

मुलाचा वाढदिवस साजरा करून रावेरला परत जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेल्या अनिल जाधव (वय ३६, रा. रावेर) यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रेल्वेत चढताना तोल जाऊन ते खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री ९ वाजता घडली.

अनिल जाधव हे कुटुंबासह रावेर येथे राहत होते आणि मजुरीचे काम करत होते. त्यांच्या पत्नी जळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे माहेरी आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने ते जळगाव येथे आले होते. वाढदिवस साजरा झाल्यानंतर सोमवारी रात्री ९ वाजता ते रावेरला जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानकावर आले. कामायनी एक्सप्रेसमध्ये चढताना तोल गेल्याने ते रेल्वेखाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आला. मंगळवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here