आणखी एक सुशिक्षित तरुण बेरोजगारीचा बळी…

जळगाव समाचार डेस्क;

सध्याच्या तरुणांना रोजगार कसा आणि कुठून मिळेल हा प्रश्न आहे. त्यातून नैराश्यात जाण्याचे प्रकरण दिवसागणिक समोर येत आहेत. अश्यातच एका तरुणाने नोकरी मिळत नसल्याचे कारण चिठ्ठीत लिहित आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. खूप प्रयत्न करुन देखील चांगला जॉब लागत नसल्याने मी खूप वर्षांपासून टेन्शन मध्ये होतो. मी माझ्या स्वइच्छेने जीवन संपवित आहे, आई-पप्पा मला माफ करा अशा आशयाची सुसाईट नोट लिहून निलेश सुरेश सोनवणे (25), रा. अयोध्या नगर जळगाव (Jalgaon) या तरुणाने गळफास घेत आत्म्हत्या केली आहे. काल दि. 10 मंगळवारी रात्रीच्या सुमारास हि घटना उघडकीस आली. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईट नोट मिळून आली असून, याप्रकरणी एमआयडीसी (MIDC) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्या नगरातील निलेश सोनवणे या तरुणाचे पदव्युत्तरपर्यंत शिक्षण झालेले होते. तो आई-वडील व मोठ्या भावासह अयोध्यानगरात वास्तव्यास होता. नोकरीसाठी नेक प्रयत्न करूनही हाती यश लागत नसल्याने तो मानसिक तणावात होता. मंगळवारी त्याचे आई-वडील व भाऊ हे सर्व इगतपुरी येथे लग्नाला गेले असतांना त्याने एकता असल्याचा फायदा घेत राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली.
पालकांचा कॉल उचलला नाही…
त्याचे आईवडील त्याला संपर्क करत होते, मात्र त्याचा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी गल्लीतील मित्रांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले. मित्र रात्री 10 च्या सुमारास घरी आल्यावर निलेश गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आला. मित्रांनी तत्काळ त्याच्या घरच्यांना आणि पोलिसांना ही माहिती दिली. याप्रकरणी एमआयडीसी (MIDC) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here