जळगाव समाचार | २८ मे २०२५
सोमवार, 26 मे रोजी दुपारी सुमारे 2:30 वाजता सप्तशृंगगडाच्या शीतकड्यावरून एका युवक आणि युवतीने दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
वणी येथील अदित्य संजय देशमुख आणि फोपशी येथील मोनिका किसन शिरसाठ अशी या दोघांची नावे आहेत.
घटनेची माहिती भातोडे गावचे पोलिस पाटील विजय राऊत यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोघांचे मृतदेह जवळपास आढळून आले.
सध्या वणी पोलिस ठाण्यात दोघांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

![]()




