जळगावात विजयादशमीनिमित्त रणरागिणी शस्र पूजन

जळगाव (प्रतिनिधी) : सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे महिलावर्गास बळ देण्यासाठी, त्यांना स्व-संरक्षण करता यावे यासाठी विजयादशमी निमित्ताने यंदा प्रथमच जळगांव शहरात रणरागिणी शस्र पुजनाचा कार्यक्रम शहरातील नवीपेठ येथे जयप्रकाश नारायण चौकात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

जळगांव शहराच्या खासदार स्मिताताई वाघ, माजी महापौर सीमाताई भोळे, डॉ. केतकीताई पाटील, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सायली पाटील, सुमित्रा पटेल, विधिज्ञ अनुराधा वाणी यांनी शस्त्र पूजन करून उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाचा मूळ उद्देश महिलांना हिम्मत देऊन त्यांना स्व-संरक्षणासाठी प्रेरित करणे, त्या दुर्गेचे रूप आहेत आणि देवीच्या हातात दांडिया नसून शस्त्र आहे याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी समितीच्या पूनम पाटील, धनश्री दहिवदकर, वैष्णवी बारी यांनी दंडसाखळी, लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, कराटे यासारखे स्व-संरक्षण करणारे प्रात्यक्षिक सादर केले.

सूत्र संचालन हिंदु जनजागृती समिती रणरागिणी शाखेच्या दिव्या पाटील यांनी केले. यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे समन्वयक सूरज दायमा, धनंजय चौधरी, भूषण शिंपी, सुजय चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे गजानन तांबट, निरंजन चौधरी, निखिल कदम, सागर आवटे, जितेंद्र चौधरी, आशिष गांगवे इत्यादींचे सहकार्य लाभले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here