Thursday, January 9, 2025
Homeजळगावबहुभाषिक ब्राह्मण महिला संघातर्फे मोफत रक्त - नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे...

बहुभाषिक ब्राह्मण महिला संघातर्फे मोफत रक्त – नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन

जळगाव समाचार डेस्क | २१ नोव्हेंबर २०२४

शहराच्या सामाजिक क्षेत्रात सातत्याने समाजपयोगी नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या बहुभाषिक ब्राह्मण महिला संघातर्फे उद्या (दि.२२) सकाळी सात ते अकरा या वेळात काव्य रत्नावली चौक येथे मोफत रक्त तपासणी, नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
या मोफत रक्त तपासणी, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरासाठी रेडक्रॉस जळगावचे अनमोल सहकार्य लाभले आहे. हे शिबिर समाजातील सर्व घटकांसाठी असल्याने, शहरवासियांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाच्या अध्यक्षा सौ. वृंदा भालेराव, पदाधिकारी व कार्यकारिणीतर्फे करण्यात आलेले आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page

Jalgaon Samachar WhatsApp Group