प्रभाग १३ ड मध्ये प्रफुल देवकरांना प्रचारात जनतेचा पाठिंबा…

 

जळगाव समाचार | १३ जानेवारी २०२५

जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून, सर्वच प्रभागांमध्ये प्रचाराची चुरस शिगेला पोहोचली आहे. अखेरच्या टप्प्यात मतदारांशी थेट संवाद साधत उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अशाच वातावरणात प्रभाग क्र. १३ ‘ड’ मध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार प्रफुल देवकर यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रचारादरम्यान सर्वसामान्य नागरिक, युवक, महिला तसेच ज्येष्ठ मतदारांनी प्रफुल देवकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट होत आहे. विकासाभिमुख भूमिका, लोकांशी असलेली थेट संवादाची नाळ आणि सामाजिक प्रश्नांबाबतची सकारात्मक दृष्टी यामुळे प्रभागात प्रफुल देवकर हे भावी नगरसेवक म्हणून निश्चितच पुढे येत असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत.

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) देखील या निवडणुकीत प्रभावी ताकद असल्याचे प्रभाग १३ ‘ड’ मधील वातावरणातून दिसून येत आहे. “अनुभवाची शिदोरी आणि नव्या विचारांची जोड” हीच या प्रचाराची प्रमुख ओळ ठरत असून, मतदारांमध्येही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रफुल देवकर यांच्या प्रचाराला मिळणारी वाढती गर्दी आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, प्रभाग १३ ‘ड’ मध्ये निकालाबाबत उत्सुकता अधिकच वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here