प्रभाग ५ अ मध्ये अपक्ष उमेदवार पियूष नरेंद्र पाटील यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

जळगाव समाचार | ९ जानेवारी २०२५

जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असून सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवार प्रभागनिहाय प्रचारात व्यस्त आहेत. मोठ्या नेत्यांच्या सभांपासून ते घरोघरी संपर्क मोहिमेपर्यंत विविध माध्यमांतून प्रचार सुरू असताना, प्रभाग क्रमांक ५ अ मध्ये अपक्ष उमेदवार पियूष नरेंद्र पाटील यांच्या प्रचाराला मात्र नागरिकांकडून विशेष आणि उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. कोणत्याही पक्षीय दबावाविना, थेट जनतेशी संवाद साधत पियूष पाटील मतदारांचा विश्वास संपादन करत आहेत.

अपक्ष उमेदवार पियूष नरेंद्र पाटील हे स्वच्छ, पारदर्शक आणि मूल्याधिष्ठित राजकारणाची ओळख असलेले दिवंगत नरेंद्रअण्णा भास्कर पाटील यांचे सुपुत्र आहेत. नरेंद्रअण्णा पाटील हे आपल्या काळातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जात होते. प्रभाग क्रमांक ५ हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ होता आणि जनहितासाठी निस्वार्थपणे काम करणारा नेता म्हणून त्यांची संपूर्ण जळगाव शहरात ख्याती होती. त्याच सामाजिक आणि राजकीय वारशातून प्रेरणा घेत पियूष पाटील यांनी जनसेवेचा वसा पुढे चालवण्याचा निर्धार केला आहे.

प्रचारादरम्यान नागरिकांकडून पियूष नरेंद्र पाटील यांच्याबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त होत असून, “वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रभागाचा सर्वांगीण विकास साधावा” अशी भावना मतदार व्यक्त करत आहेत. संयमी स्वभाव, अभ्यासू नेतृत्व आणि प्रभागाच्या प्रश्नांची सखोल जाण असलेले पियूष पाटील हे नव्या पिढीचे आश्वासक नेतृत्व म्हणून पुढे येत असून, त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे आणि प्रामाणिक भूमिकेमुळे प्रभाग ५ अ मध्ये त्यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here