जळगाव समाचार डेस्क | १२ डिसेंबर २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर कार्यकारिणी काल दिनांक 11 डिसेंबर 2024 पासून बरखास्त करण्यात आली आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे पक्षाच्या पुढील धोरणांबाबत आणि कार्यप्रणालीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
महत्वाचे म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जळगाव महानगरातील विविध पदाधिकाऱ्यांवर याचा परिणाम होणार असून, नव्या नियुक्त्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.