जळगाव समाचार | ६ नोव्हेंबर २०२५
मराठी रंगभूमी दिन जळगावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे एकत्र येऊन सर्व रंगकर्मींनी नटराज मूर्ती तसेच तबला, पेटी, संवादिनी आणि रंगरंगोटी पेटी (मेकअप बॉक्स) यांचे विधिवत पूजन केले. पूजनानंतर ज्येष्ठ रंगकर्मी श्री. चिंतामण पाटील (मास्तर) यांनी नारळ फोडून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
रंगदेवतेला वंदन म्हणून डॉ. उल्हास कडूस्कर लिखित ‘शब्द सुरांच्या रेशीम गाठी’ या नाटकातील नांदीचे सादरीकरण करण्यात आले. खान्देश नाट्य प्रतिष्ठानचे कलाकार दुष्यंत जोशी आणि संजय कुलकर्णी यांनी नांदी गायली. तबल्यावर मोहन रावतोळे तर संवादिनीवर भूषण खैरनार यांनी सुंदर साथसंगत दिली. उपस्थित रंगकर्मींनी नांदीद्वारे रंगदेवतेला अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे यांनी केले होते. या वेळी शहरातील अनेक मान्यवर आणि ज्येष्ठ रंगकर्मी उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख रंगकर्मी :
पीयुष रावळ, विनय काबरा, संजय निकुंभ, चंद्रकांत अत्रे, गुलाब शेख, चंद्रकांत चौधरी, अरुण सानप, शरद पांडे, विनोद ढगे, अनिल मोरे, जगदीश नेवे, सुभाष मराठे, शरद भालेराव, आकाश बाविस्कर, प्रदीप भोई, अविनाश चव्हाण, भगवंत फडणीस, महेंद्र खेडकर, पवन खंबायत, बळवंत गायकवाड, नेहा पवार, शुभदा नेवे, मानसी नेवे, धनंजय राजहंस, अविनाश मोघे, विजय पाठक, प्रा. सुधीर भटकर, योगेश शुक्ल, बोरसे दादा, गणेश सोनार, सचिन महाजन, सुभाष गोपाळ, नितीन तायडे, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, तुषार वाघुळदे, मोहीत पाटील, अमोल ठाकूर आदी रंगकर्मी उपस्थित होते.

![]()




