जळगाव समाचार डेस्क| ७ ऑगस्ट २०२४
सोलापूरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने शहरातील जनजीवन ठप्प केले आहे. पाच लाख आंदोलकांमुळे सोलापूर शहरातील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे, ज्यामुळे राजकारणाच्या मुद्द्यावरून सामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. या मागण्या मान्य करणे महायुती सरकारसाठी मोठे आव्हान ठरले आहे. महायुती सरकारसाठी हे आंदोलन एक गंभीर परिस्थिती निर्माण करत आहे. आंदोलकांच्या मागण्यांवर विचार करणे अपरिहार्य झाले आहे. याआधीही मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाने सरकारला धारेवर धरले होते, आणि आता पाच लाख आंदोलकांच्या समर्थनाने त्यांनी पुन्हा लढा सुरु केला आहे.
आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम
या आंदोलनामुळे आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जर आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या, तर सरकारला जनतेचा पाठिंबा मिळू शकतो. परंतु, मागण्या मान्य न झाल्यास सरकारविरोधात असंतोष वाढू शकतो हे निश्चित दिसत आहे. अश्यातच जरांगे यांनीही आपण सरकार पाडण्याची भाषा अनेकवेळा बोलून देखील दाखवली आहे.
सोलापूरमध्ये सुरु असलेल्या या आंदोलनाचे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. आता महायुती सरकार या आव्हानाला कसा प्रतिसाद देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

![]()




