Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगBreaking: कोण होईल लोकसभा अध्यक्ष? सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने...

Breaking: कोण होईल लोकसभा अध्यक्ष? सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने…

नवी दिल्ली, जळगाव समाचार डेस्क;

18 व्या लोकसभेच्या (Loksabha) नवीन सभापती (New Speaker) पदाबाबत नवा ट्विस्ट समोर आला आहे. आता या प्रतिष्ठेच्या पदासाठी विरोधक इंडिया आघाडीनेही लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार उभा केला आहे. केरळ काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी विरोधकांच्या वतीने सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. आता त्यांचा सामना एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांच्याशी होणार आहे. काँग्रेसने उपसभापतीपदाच्या मुद्द्यावर सरकार सहकार्य करत नसल्याचा आरोप केला, त्यानंतर त्यांनी सभापतीपदाचा उमेदवार जाहीर केला.
काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले की, लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक विरोधक लढवतील आणि सरकार विरोधकांना उपसभापतीपद देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. दरम्यान भारताच्या इतिहासात सत्ताधारी पक्ष आणि विरोधक सभापतीपदासाठी निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ओम बिर्ला दिसणार स्पीकरच्या खुर्चीवर?
18 व्या लोकसभेत सभापती आणि उपसभापतींचा चेहरा जवळपास स्पष्ट झाला आहे. पुन्हा एकदा ओम बिर्ला स्पीकरच्या खुर्चीवर दिसणार आहेत. ते सलग तिसऱ्यांदा राजस्थानमधील कोटा येथून खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांना पहिल्यांदाच स्पीकर बनवण्यात आले. आणि आता ते दुसऱ्यांदा या पदावर विराजमान होणार आहेत. सुरेशबद्दल बोलायचे झाले तर ते केरळमधील मावेलीकराचे खासदार आहेत. ते ८व्यांदा खासदार म्हणून निवडून आले असून त्यांना लोकसभा सदस्य म्हणून सर्वाधिक अनुभव आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page