जळगाव (प्रतिनिधी) : शहरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे पडघम आता वाजू लागले आहे. प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. दरम्यान आज (दि.६) सकाळी मॉर्निग वॉक करत असतांना महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी शहरात विविध ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेत, त्यांच्याशी संवाद साधला. शहरातील बहुतांश नागरिक महात्मा गांधी उद्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान, रिंगरोडवरील पु.ना.गाडगीळ शोरुम समोरील मैदान तसेच बहिणाबाई उद्यान येथे सकाळी मॉर्निग वॉक करण्यासाठी येत असतात. आज महाविकास आघाडी व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी या ठिकाणी मॉर्निग वॉक करत नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी शहरातील विविध समस्या, नागरिकांना येणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा करून महाविकास आघाडीला मत म्हणजे शहराच्या सर्वांगिण विकासाला मत म्हणून मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मताधिक्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.
मॉर्निंग वॉक करताना जयश्रीताई महाजन यांनी साधला मतदारांशी संवाद
संबंधित बातम्या