जळगाव समाचार डेस्क| २७ जुलै २०२४
पावसामुळे झाडांच्या फांद्या वाढल्याने वीजपुरवठा खंडित होतो किंवा अनेक ठिकाणी समस्या येत, तसेच पाईपलाईन मधून गढूळ पाणी येऊ लागते या मुळे जळगाव (Jalgaon) शहरात विद्युत तारांच्या दुरुस्ती व वाघूर पंपिंग व उमाळा जलशुध्दीकरण केंद्र येथील विद्युत वाहिनीवरील झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम आज शनिवार दि. 27 जुलै रोजी करण्यात येणार असल्याने नियोजित पाणीपुरवठा हा एक दिवस उशिराने केला जाणार आहे. तरी जळगावकरांनी पाणी जपून वापरण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
शनिवारी होणारा पाणीपुरवठा रविवारी या भागात होणार आहे.
वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड व परिसर. नित्यानंदनगर टाकी परिसर मोहननगर, नेहरूनगर परिसर, खंडेरावनगर परिसर- हरीविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, गायत्रीनगर, नूतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी, मानराज टाकीवरील भाग- दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी.
खोटेनगर टाकीवरील भाग- द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्री नगर, पोलीस कॉलनी परिसर, खोटेनगर, गेंदालाल मिल टाकीवरील शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एस.एम.आय.टी. परिसर. डायरेक्ट योगेश्वर नगर, हिरा पाईप व शंकरराव नगर व खेडीगांव परिसर. डी.एस.पी. टाकी तांबापुरा, गणपती नगर, आदर्शनगर व इतर परिसर. शिवकॉलनी, विदयुत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर व इतर भाग. अयोध्यानगर पहिला दिवस- गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हौ. सोसा., जगवानीनगर मेहरुण, सदाशिव नगर, रामनगर, रजा कॉलनी, अक्सानगर, गणेशपुरी, मलिकनगरात पाणी पुरवठा होईल.

![]()




