जळगाव समाचार डेस्क;
पावसाळा सुरु होऊन महिनाभर उलटला तरीही गटारींचे निकासी मार्ग हे मोकळे नाहीत. त्यामुळे त्या तुंबून त्याचा त्रास हा सामान्यांना भोगावा लागतो आहे. यावरून जळगाव मनपा प्रशासकीय यंत्रणेच्या अनागोंदी कारभार हा स्पष्टपणे दिसून येतो आहे.
आज दुपारी झालेल्या पावसामुळे शहरातील नवीन बी. जे. मार्केट मध्ये तळमजल्यावरील दुकानांमध्ये पाणी जाऊन दुकानदारांचे नुकसान झाले. गेल्या आठवड्यात जळगाव मनपा प्रशासकीय यंत्रणेला पावसाळ्यात होणार्या परीस्थितीचा फोटो सहित कल्पना तेथील व्यापार्यांनी देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम त्यांना सहन करावा लागत आहे. अजून पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली तेव्हा हि परिस्थिती आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने लवकरात लवकर योग्य पावले उचलावी असा एकच सूर व्यापाऱ्यांचा आहे.

![]()




