जळगाव समाचार डेस्क| २९ जुलै २०२४
अवघ्या काही दिवसांपूर्वी आपल्या अमळनेर येथील घराच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत चिन्हाचे पोस्टर्स लावून आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणारे माजी आमदार कृषिभूषण पाटील आज पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. त्याचे निमित्त म्हणजे आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी त्यांची भेट घेतल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.(Jalgaon)
मात्र कृषिभूषण पाटलांच्या सोशल मिडिया वर यासंबंधी एक स्पष्टीकरण देणारी चित्रफित सहित एक मजकूर टाकण्यात आला आहे. तो खालील प्रमाणे
आज दि २९ रोजी झालेल्या घडामोडीनवर विश्वास ठेऊ नये आज रोजी आदर्शगाव राजवड येथे मा.आ.श्री.अनिल दादा पाटील मंत्री महोदय व माजी नगरसेवक हे मा.सौ.जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील याची तब्वेत खराब होती ते नाशिक येथे होत्या त्या रविवारी राजवड गावी आल्या त्याच्या तब्वेतीची बघण्यासाठी पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा भेट करण्यासाठी गेले होते याच्यात राजकीय चर्चा कोणतीच न होती त्याच्या मुळे कोणीही राजकीय व चर्चा वळण आणू नये मा.आ.कृषिभूषण साहेबराव दादा आपली भूमिका ९ ऑगस्ट क्रांती दिनी आपली भूमिका मांडतील कृपया कुणीही गैरसमज करू नये ही विनती.
अमळनेर विधान सभा मतदार संघातील तमाम सोहबराव दादा वर प्रेम करणारी मंडळी याना विनती की ऑगस्ट रोजी क्रांती दिनी पत्रकार परिषद घेऊन मा.आ.कृषिभूषण साहेबराव दादा भूमिका स्पष्ट करतील कृपया तोवर अपप्रचार करू नये ही आपणास कळकळीची विनंती.

![]()




