जळगाव पोलिस दलाच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या खात्याचा चुकीचा उल्लेख, पण मंत्र्यांनी घेतली संयमाची भूमिका


जळगाव समाचार | २५ मे २०२५

जळगावमध्ये पोलिस दलाच्या “स्मार्ट ई-बीट सिस्टीम” या नव्या सॉफ्टवेअरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र, कार्यक्रमातील डिजिटल स्क्रिनवर त्यांच्या नावासमोर चुकीने “जलसंपदा मंत्री” असा उल्लेख करण्यात आला.

हा उल्लेख चुकीचा होता, कारण सध्या जलसंपदा खाते गिरीश महाजन यांच्याकडे आहे, तर गुलाबराव पाटील पाणीपुरवठा विभागाचे मंत्री आहेत. ही चूक चर्चेचा विषय ठरली, विशेषतः जळगावचेच मंत्री असूनही पोलिस विभागाने त्यांच्या खात्याचा गोंधळ घातल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले.

मात्र, यावर स्वतः मंत्री गुलाबराव पाटील यांनी संयमी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले, “पाणीपुरवठा आणि जलसंपदा दोन्ही खाती पाण्याशी संबंधित असल्याने ही मानवी चूक आहे. मला याचे काहीच वाईट वाटले नाही.”

दरम्यान, “स्मार्ट ई-बीट सिस्टीम” ही पोलिस दलासाठी एक आधुनिक डिजिटल प्रणाली आहे, जी मोबाईल व वेब अ‍ॅपद्वारे गस्त नियंत्रण अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणार आहे. भारतातील काही ठिकाणी ही प्रणाली आधीच कार्यरत असून आता ती जळगाव जिल्ह्यातही सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here