जळगाव समाचार डेस्क| १७ ऑगस्ट २०२४
जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या प्रचंड अस्थिर झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला जुने सहकारी पुन्हा एकत्र येत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेल्या काही वर्षांपासून स्थिर असलेल्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शरद पवार गटाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला नव्याने उभारी मिळणार असल्याचे या घडामोडींमधून स्पष्ट दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात जुने सहकारी आणि स्थानिक नेते पुन्हा एकत्र येत आहेत. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील राजकीय सूत्रधार आणि कार्यकर्त्यांमध्ये ही हालचाल मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला या घडामोडींमुळे नवी ऊर्जा मिळेल, असे मानले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या सोबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे त्यांचा शरद पवार गटात पुनःप्रवेश होणार असल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी आपला राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील अजित पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. याशिवाय, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांनी दोन कार्यकर्त्यांना न विचारता परस्पर नियुक्त्या केल्याने असंतोष अधिकच वाढला. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे आणि इतर २० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यात तीन उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस, चिटणीस, संघटक, आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख यांचा समावेश आहे.
या राजकीय उलथापालथीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात नव्याने बळ मिळू शकते. शरद पवार गटाच्या नेतृत्वाखालील जुने सहकारी आणि स्थानिक नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे गटाचे वर्चस्व आणि ताकद वाढण्याची शक्यता आहे. या घटनांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
अजित पवार गटातून आणखी मोठे नेतृत्व शरद पवार गटात जाणार?
जळगाव जिल्ह्यात अजित पवार गटातील आणखी एका मोठ्या नेत्याच्या शरद पवार गटात जाण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अजित पवार गटाला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा जिल्ह्यात पुन्हा “अभिषेक” होणार? असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
या राजकीय घडामोडी जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. शरद पवार गटाचे जुने सहकारी आणि स्थानिक नेते पुन्हा एकत्र आल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलण्याची शक्यता आहे.

![]()




