केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्याकडून जळगाव महानगरपालिकेला भेट

 

जळगाव समाचार | २ नोव्हेंबर २०२६

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ जळगाव शहरात एका विशेष कार्यक्रमासाठी आले असताना, त्यांनी रविवारी दुपारी १ वाजता जळगाव महानगरपालिकेच्या भव्य १७ मजली इमारतीला भेट दिली.

महानगरपालिकेत आगमन झाल्यावर महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी शाल व विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन केंद्रीय मंत्र्यांचे उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी खा. स्मिताताई वाघ यांनीही त्यांचे स्वागत केले. तसेच प्रशासनाच्या वतीने उप आयुक्त धनश्री शिंदे, वित्त व लेखाधिकारी राजू लाकुडझोडे आणि शहर अभियंता आर. टी. पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री संजय सेठ यांचा सत्कार केला.

यावेळी स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, तसेच नगरसेवक डॉ राध्येशाम चौधरी, दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, उज्ज्वला बेंडाळे, ॲड. शुचिता हाडा, आशा पाटील, पूजा जगताप, जयश्री पाटील, रबियाबी खान, जाकीर खान, अनिल अडकमोल, कविता पाटील, माधुरी बारी, कविता भोई यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

महायुतीच्या माध्यमातून उत्तम सुविधा मिळतील – केंद्रीय मंत्री सेठ
भेटदरम्यान, मंत्री संजय सेठ यांनी जळगाव महापालिकेच्या पर्यावरण आणि स्वच्छतेविषयी सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती महापौर दीपमाला काळे यांच्याकडून घेतली. शहरात महापौर दीपमाला काळे यांचे कार्य अत्यंत उत्तम सुरू असून, त्यांनी जनतेच्या हितासाठी असेच कार्य करत राहावे, अशा सदिच्छा त्यांनी दिल्यात. महायुतीच्या माध्यमातून जळगावच्या जनतेला आगामी काळात आणखी चांगल्या आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असा दृढ आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here