Honey Trap; जळगावच्या व्यावसायिकाचा “हनी ट्रॅप” महिलेने 3 लाख लुटले…

 

जळगाव समाचार डेस्क;

जळगाव रायसोनी नगर परिसरातील एका व्यावसायिकाची “Honey Trap” च्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. स्वतः CID अधिकारी म्हणून आपली ओळख सांगून तिने व्यावसायिकाशी जवळीक निर्माण केली होती. या महिलेला पोलिसांनी अटक केली असून सदर महिला पोलिस कोठडीत पोहोचली आहे. (Jalgaon)
याबाबत प्राप्त माहिती नुसार, रायसोनी नगर परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाची सोशल मीडियावर एका महिलेशी ओळख झाली. तिने आपण सीआयडी (CID) अधिकारी असल्याचे सांगून तिचे पती रेल्वेत टी.सी. असल्याचे व्यावसायीकाला सांगितले. दरम्यान ती 7 मार्च रोजी धुळे येथे सदर व्यावसायिकाला भेटली. तेथे जेवणात गुंगीचे औषध देत एका फ्लॅटवर घेवून जात त्या व्यावसायीकाचे नको त्या अवस्थेत फोटो काढले, आणि इतकेच नाही तर त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
तसेच तू माझ्यासोबत रिलेशनशीप सुरु ठेव, नाही तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी देत महिलेने व्यावसायीकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. याशिवाय मी गरोदर असल्याचे सांगत त्या महिलेने व्यावसायीकाकडून तीन लाख रुपये उकळले.
दरम्यान महिला इतक्यातच न थांबता ती काही दिवसांपूर्वी थेट व्यावसायीकाच्या घरी गेली. आणि तिने त्याला तब्बल १५ लाखांची मागणी केली. तसेच व्यावयीकासह त्यांच्या पत्नीला लोखंडी सळईने मारहाण केली. यादरम्यान त्या महिलेने त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅमची चैन व त्यांच्या पत्नीचे ३० ग्रॅमचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून तेथून निघून गेली. शेजारच्यांनी व्यावसायीक दाम्पत्याला त्या महिलेच्या तावडीतून सोडवित त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. व्यावसायीकाने महिलेबाबत माहिती काढली असता, ती महिला अशाच प्रकारे अनेकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे वसुल करीत असल्याचे समोर आले. त्या महिलेविरुद्ध यापूर्वी जळगाव शहर व भडगाव पोलिस ठाण्यात हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले.
महिलेला १५ जुलै पर्यंत पोलिस कोठडी…
हनी ट्रॅप करणारी आरोपी महिलेणे स्वतःची ओळख सांगतांना आपले दोन ते तीन नाव सांगितले, हि सध्या रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवास करते. ती मूळ मुक्ताईनगर येथील असल्याचे समजते. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या महिलेला शुक्रवारी अटक केली. त्या महिलेला न्यायालयात हजर केले असता, तिला १५ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here