जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये ३२५ रिक्त होमगार्ड्सची पदे भरण्यासाठी निवड प्रक्रिया…

जळगाव समाचार डेस्क। २० ऑगस्ट २०२४

जळगाव जिल्ह्यात होमगार्डच्या विविध पदांसाठी ३२५ रिक्त पदे भरण्यासाठी नोव्हेंबरमध्ये निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. दिनांक २५ जुलै २०२४ ते १४ ऑगस्ट २०२४ या कालावधीत आयोजित ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत २१२३४ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांमध्ये पुरुष आणि महिला उमेदवारांचा समावेश आहे.

निवड प्रक्रियेसाठी वेळापत्रक:

उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीसाठी बोलविण्यात येणार आहे. उमेदवारांना दिनांक २९ ऑगस्ट २०२४ पासून बोलावण्यात येईल. अर्ज क्रमांकानुसार उमेदवारांना खालीलप्रमाणे तारखांना बोलावले जाईल:

– २९ ऑगस्ट २०२४: अर्ज क्रमांक ०१ ते ४००० (पुरुष)
– ३० ऑगस्ट २०२४: अर्ज क्रमांक ४००१ ते ८००० (पुरुष)
– ३१ ऑगस्ट २०२४: अर्ज क्रमांक ८००१ ते १२००० (पुरुष)
– ०१ सप्टेंबर २०२४: अर्ज क्रमांक १२००१ ते १६००० (पुरुष)
– ०२ सप्टेंबर २०२४: अर्ज क्रमांक १६००१ ते २१०५५ (पुरुष)
– ०३ सप्टेंबर २०२४: सर्व महिला उमेदवार

उमेदवारांनी सदरच्या तारखांना आवश्यक कागदपत्रे, दोन पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे. याशिवाय बाहेरील जिल्ह्यातील उमेदवारांची नोंदणी रद्द करण्यात आली असून, केवळ जळगाव जिल्ह्यातील उमेदवारांनाच या निवड प्रक्रियेत सहभागी होता येईल.

उमेदवारांनी योग्य तारखेला उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली असून, गैरहजेरीमुळे उमेदवारांची नावे कायमस्वरूपी वगळण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here