जळगावमध्ये गोळीबारप्रकरणी सहा जण अटकेत…


जळगाव समाचार | ३० एप्रिल २०२५

वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार करणाऱ्या टोळीतील सहा जणांना रामानंद नगर पोलिसांनी मोहाडी गावातून पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महेंद्र समाधान सपकाळे (वय २०, रा. प्रबुद्ध नगर, पिंप्राळा) हा मित्राचा वाढदिवस साजरा करत असताना त्याच्यावर कोयता आणि गावठी कट्टा घेऊन आलेल्या काही व्यक्तींनी अचानक गोळीबार केला. या गोळीबारात तीन राऊंड फायर करण्यात आले आणि महेंद्रच्या कमरेखाली गोळी लागली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

महेंद्र सपकाळे याच्या वडिलांना मारहाण करून त्यांचा पाय फ्रॅक्चर करण्यात आला होता. या घटनेचा राग मनात ठेवून बदला घेण्यासाठी हा गोळीबार केल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

गोळीबार केल्यानंतर मुख्य आरोपी विशाल भिका कोळी याने आपल्याकडील गावठी कट्टा रामेश्वर कॉलनीतील आपल्या मित्र गिरीश किशोर घुगे याच्याकडे लपवून ठेवला होता. पोलिसांनी चौकशीदरम्यान हा कट्टा हस्तगत केला आहे.

रामानंद नगर पोलिसांनी तपास करत मोहाडी गावातून पहाटेच्या सुमारास खालील सहा आरोपींना अटक केली:
1. विशाल भिका कोळी
2. अक्षय उर्फ बाब्या बन्सीलाल धोबी
3. धिरज उर्फ वैभव उर्फ गोलू कोळी
4. सागर अरुण भोई उर्फ जाड्या भोल्या
5. नितेश उर्फ गोल्या मिलिंद जाधव
6. गिरीश किशोर घुगे

असलेले गुन्हेगारी रेकॉर्ड
• विशाल कोळी याच्यावर ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
• नितेश जाधव याच्यावर तब्बल १५ गुन्हे आहेत.
• या दोघांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
• अक्षय उर्फ बाब्या धोबी याच्यावर ८ गुन्हे दाखल असून तो पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, आणि रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप वाघ, उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, सफौ संजय सपकाळे, जितेंद्र राजपूत, पोहेकॉ जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, इरफान मलिक, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, विनोद सुर्यवंशी, उमेश पवार, रविंद्र चौधरी, प्रवीण सुरवाडे यांच्या पथकाने केली. या प्रकरणात पुढील तपासात आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here