जळगाव तालुक्यातील घटना; नात्यातील तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी गरोदर राहून बाळाला जन्म…

जळगाव समाचार | ७ एप्रिल २०२५

जळगाव तालुक्यातल्या एका गावात १५ वर्षांच्या मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या अत्याचारामुळे ती मुलगी गरोदर राहिली आणि तिने बाळाला जन्म दिला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीडित मुलीच्या नात्यात असणाऱ्या गणेश बोरसे याने मुलीला शेजारच्या नाल्याजवळ बोलावून तिच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर अनेक वेळा तिला तिथे बोलावून तिच्यावर अत्याचार करत राहिला. कुणालाही काही सांगू नको, असं म्हणत त्याने तिला धमकीही दिली. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिची प्रसूती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला आहे.

शेवटी, ही गोष्ट समोर आल्यानंतर पीडित मुलीने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गणेश बोरसे याला अटक केली असून ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here