अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू…

 

जळगाव समाचार डेस्क| २७ जुलै २०२४

30 वर्षीय तरुण आपल्या मित्रांसोबत रविवारी २१ जुलै रोजी रात्री ११ वाजता भुसावळ कडून जळगावकडे परत येत असताना नशिराबाद जवळील गैबनशाह पीर बाबा दर्ग्याजवळ रस्त्यालगत नील गायला वाचविण्याच्या प्रयत्नात कार उलटल्याने मोठा अपघात झाला होता. यावेळी या अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.(Jalgaon)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश आपल्या मित्रांसोबत रविवारी २१ जुलै रोजी सायंकाळी भुसावळकडे गेला होता. रात्री ११ वाजता जळगावकडे परत येत असताना नशिराबाद जवळील गैबनशाह पीर बाबा दर्ग्याजवळ रस्त्यालगत अचानक नील गाय आली. नील गायला वाचविण्याच्या प्रयत्नात कार उलटल्याने मोठा अपघात घडला. मात्र, एअरबॅग उघडल्याने कारमधील तिघांचा जीव वाचला होता. या अपघातादरम्यान अविनाशच्या पोटाला अंतर्गत दुखापत झाली होती. अविनाशने किरकोळ उपचार घेत त्या जखमेकडे दुर्लक्ष केले. मात्र, पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी अविनाशची तब्येत बिघडली. त्याला जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याठिकाणाहून त्याला पुन्हा नाशिकला हलविण्यात आले. मात्र बुधवारी २४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा गेल्याने परिवारावर मोठा आघात झाला आहे.
मुळ धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील अविनाशने काही महिन्यांपुर्वी स्वत:चा व्यवसाय सुरु केला होता. त्याचे वडील कैलास पाटील हे एसटी महामंडळात नोकरीला आहेत. अविनाशच्या पश्चात पत्नी, अडीच वर्षांचा मुलगा रिहान, विवाहित बहिण, आई, वडील असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here