जळगाव समाचार डेस्क;
गेल्या 12 वर्षापासुन महासंघाच्या वतीने शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य शिबीर, पर्यावरण संवर्धन, गुणगौरव समारंभ, गौरव गुरूजनांचा, थोर महापुरूष स्मृतिदिन असे अनेक समाज प्रबोधनपर विविध कार्यक्रम राबविले जात आहे. (Jalgaon)
तसेच यावर्षी देखील सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशिय विकास संस्था जळगाव, युवा विकास फाउंडेशन जळगांव, रोटरी क्लब ऑफ सेंट्रल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जिल्हयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन दि. १४ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ वाजेला सरदार वल्लभभाई पटेल लेवा हॉल जळगाव याठिकाणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री मा.गुलाबरावजी देवकर, माजी खासदार जळगाव लोकसभा मा.उन्मेशदादा पाटील, लोकसंघर्ष मोर्चा अध्यक्ष सौ.प्रतिभाताई शिंदे, आय.एस.ए.जळगाव अध्यक्ष डॉ. ए.जी.भंगाळे व इतर प्रमुख पाहुणे देखील कार्यक्रमास्थळी उपस्थित राहतील.
तरी शाळा / कॉलेज मधील इ. 10 वी (75 टक्केच्यावर), इ. 12 वी (70 टक्केच्यावर). कला, वाणिज्य, विज्ञान, संघणक, आय.टी., डी.एड., बी.एड., डिप्लोमा, इंजिनियरींग, विधी, पदवी, पदव्युत्तर, आर्किटेक्चर, एम.फिल., पी.एच.डी., प्रशासकिय सेवा परीक्षा यामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित द्यावी असे आवाहन शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख व युवा विकास फाउंडेशन जळगांव अध्यक्ष विष्णु रामदास भंगाळे यांनी केले आहे.