जळगाव समाचार डेस्क| २३ ऑगस्ट २०२४
या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या नरमाईमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूंच्या किंमतींमध्ये मोठा बदल झाला नव्हता, मात्र नंतर त्यात चढ-उतार पाहायला मिळाले. सुरुवातीला सोन्याच्या किंमतीत 550 रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या दरात 1,000 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर किंमती स्थिर राहिल्या, पण गुरुवारपासून सोन्याच्या किंमतीत घसरणीची नोंद झाली आहे, तर चांदीच्या किंमतीत स्थिरता आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात विशेष बदल झाला नव्हता. मात्र, 20 ऑगस्ट रोजी सोन्याच्या किंमतीत 120 रुपयांची घसरण झाली. 21 ऑगस्ट रोजी सोन्याने 550 रुपयांची वाढ घेतली, तर 22 ऑगस्ट रोजी 380 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 66,950 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 72,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात 4,000 रुपयांची मोठी वाढ झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही, मात्र 20 ऑगस्ट रोजी चांदीच्या दरात 1,000 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर 21 आणि 22 ऑगस्ट रोजी चांदीचा दर स्थिर होता. आज सकाळच्या सत्रात चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे संकेत मिळाले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, सध्या चांदीचा दर 86,900 रुपये प्रति किलो आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोन्याचा दर 71,599 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट 71,312 रुपये, 22 कॅरेट 65,585 रुपये, 18 कॅरेट 53,699 रुपये, तर 14 कॅरेट सोन्याचा दर 41,885 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. एक किलो चांदीचा दर 84,820 रुपये आहे. वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कोणताही कर किंवा शुल्क नसते, तर सराफा बाजारात शुल्क आणि करामुळे दरात तफावत आढळते.
सोन्या-चांदीच्या किंमतीत झालेल्या या घटनेमुळे ग्राहकांना सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी हा योग्य काळ ठरू शकतो.

![]()




