पिंप्राळ्यात विजेचा धक्का लागल्याने 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू…

जळगाव समाचार डेस्क| ६ सप्टेंबर २०२४

पिंप्राळा येथील सोमानी गल्लीमध्ये राहणाऱ्या रंजिता राहुल सोनार (वय २४) या तरुणीचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी, ५ सप्टेंबर रोजी घडली. दुपारी सुमारे दीड वाजता ही घटना घडली असून, सायंकाळी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रंजिता सोनार आपल्या कुटुंबासोबत हरिविठ्ठल नगरातील सोमानी गल्लीत वास्तव्याला होती. गुरुवारी ती घरी घरकाम करत असताना अचानक विजेचा धक्का बसल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करताच मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले या प्रकरणाचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here