जळगाव समाचार | १६ मे २०२६
राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात हमाल-मापाडी, महिला कामगार तसेच शिलाई कामगारांसाठी रुमाल वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कामगारांना उन्हापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने भाजप व्यापारी आघाडीतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते सुमारे २५० पुरुष व महिला कामगारांना रुमालांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक राठी तसेच भाजप व्यापारी आघाडीचे विनय बाहेती यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपक्रमास हमाल-मापाडी कामगार व व्यापारी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी हमाल कामगार अध्यक्ष इंद्रराज सपकाळे, कॉमेश सपकाळे, शरद मामा चौधरी, नगरसेवक विरण खडके, विजय वानखेडे, विनोद मराठे, मिलिंद चौधरी, प्रकाश डोडिया, विष्णुकांत मणियार, दीपक महाजन, सुनील तापडिया, मांगीलाल जैन, मुकेश कुकरेजा, कीर्तन सेजपारा, अभिलाष राठी, दर्पण पाटील, यश राठी, संजय शहा, रवींद्र फालक, प्रकाश बिर्ला, महेश पुरोहित, योगेश धूत, किरण कुलकर्णी, आकाश मंडोरा, सतनाम बावरी, संदीप दहाड, मयूर जाखेटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक राठी यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनय बाहेती यांनी मानले.

![]()




