जळगाव समाचार डेस्क;
“आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा” एवढेच ध्येय मनाशी ठरवून दि. 17 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशीनिमित्त
इंजि.स्वप्निल पाटील अध्यक्ष कल्पना फाउंडेशन पारोळा व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रा.ति. काबरे विद्यालय, एरंडोल. येथे मोफत भव्य आरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला एरंडोल वासियांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच स्वप्निल दादा मित्रपरिवार यांचे कडून या कार्यक्रमाला अनमोल सहकार्य मिळाले.
यावेळी शिबिरासाठी भारतीय जनता पार्टीचे खा. स्मिता वाघ , भा.ज.पा जिल्हा चिटणीस निलेश परदेशी ,जगदीश ठाकूर , भा.ज.पा कामगार मोर्चा ता. अध्यक्ष आनंद सुर्यवंशी, विवेक ठाकूर , प्रकाश धोबी , जितू निकम , अतुल सोनार , पिंटू मावळे , मयूर ठाकूर, भगवान मराठे, शुभम साळी, भूषण बडगुजर उपस्थित होते.