यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद गजाआड…

 

जळगाव समाचार डेस्क| ३० जुलै २०२४

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने रायगडच्या उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर हिल परिसरातून अटक केली आहे. त्याला कर्नाटकातून महाराष्ट्रात आणले जात आहे.
20 वर्षीय यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यशश्री 25 जुलैपासून बेपत्ता होती, दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ आढळून आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here