Coffee with CEO : जिल्हा परिषदेच्या सीईओंशी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी संवाद

 

जळगाव समाचार | २७ ऑगस्ट २०२५

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत आयोजित “Coffee with CEO” या विशेष उपक्रमांतर्गत विविध विषयांत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

या सत्रात विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक, सृजनशील व नावीन्यपूर्ण अनुभव मांडले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरेमुळे वातावरण आनंदी व प्रेरणादायी झाले.

करनवाल यांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला उत्तेजन देत आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले. “विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्याने त्यांच्या विचारांची दिशा आणि समाजाबद्दलची जाणीव स्पष्ट होते. अशा उपक्रमांमुळे त्यांना नवनवीन संधींच्या दाराशी पोहोचता येते,” असे त्या म्हणाल्या.

स्थानिक शिक्षण क्षेत्रासाठी हा उपक्रम एक नवा पायंडा ठरणार असल्याची प्रतिक्रिया पालक व शिक्षकवर्गाकडून व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here