जळगाव समाचार डेस्क | ३० जानेवारी २०२५
चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे (चोसाका) माजी कार्यकारी संचालक अकबर शफी पिंजारी (वय ६२, रा. गुरुदत्त कॉलनी) यांनी २९ जानेवारी रोजी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
अकबर पिंजारी हे मूळचे वडती (ता. चोपडा) येथील होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि कुटुंबीय आहेत.

![]()




